जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती संख्या ही चिंतेची बाब बनली आहे. शहरीसह ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांची वाढती संख्या यामुळे Zilla Parishad School जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश सतत कमी होत आहे. त्यामुळे कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ज्याला विविध शिक्षक संघटनांनी विरोधही दर्शवला होता.
मागील पाच वर्षांत म्हणजेच सन २०२१ ते सन २०२६ या काळात जिल्ह्यात सुमारे ९० शासकीय शाळा बंद झाल्या आहेत. यात मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. सन २०२४-२५ या वर्षातच १३ शाळा बंद करण्यात आल्या, तर सन २०२५-२६ मध्ये सध्या एकही शाळा बंद करण्यात आली नाही. सध्या जिल्ह्यात अशा २१४ प्राथमिक जिल्हा परिषद शाळा आहेत, जिथे विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षाही कमी आहे. पालक आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांना प्राधान्य देत असल्याने शासकीय शाळांचे भविष्य धोयात आले आहे.
Zilla Parishad School शाळा टिकवण्यासाठी शिक्षक सतत प्रयत्न करीत आहे. प्रवेश प्रक्रियेच्या वेळी ते गावागावात जाऊन विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत. पालकांना आपल्या मुलांचे प्रवेश शासकीय शाळांमध्ये घेण्यास प्रवृत्त करत आहे. यासाठी मोफत पुस्तके, वह्या, गणवेश तसेच ये-जा करण्यासाठी वाहन सुविधा अशा सोयीही दिल्या जात आहेत. या प्रयत्नांमागे शिक्षकांची नोकरी टिकवण्याची चिंता हेही एक कारण असल्याचे मानले जाते. जर विद्यार्थ्यांची संख्या अशीच घटत राहिली, तर भविष्यात आणखी शासकीय शाळा बंद होण्याची शयता व्यत केली जात आहे.