नाट्यमय कथाकथनातून मराठा इतिहासाची झलक

23 Mar 2026 15:23:31
नागपूर,
Maratha history रामनवमी/नवरात्र उत्सवानिमित्त श्रीराम मंदिर सेवा ट्रस्टतर्फे सुरेश भट सभागृहात ‘गोष्ट इथे संपत नाही’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. या उपक्रमातून ट्रस्टची सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरा जपण्याची २० वर्षांची परंपरा अधोरेखित झाली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी संजय भेंडे, सुभाष राऊत, प्रवीण दटके आदी मान्यवर उपस्थित होते. धीरज चव्हाण यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले व कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडली.
 
Maratha history
 
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण सारंग भोईकर आणि सारंग मांडके यांचे प्रभावी कथाकथन सादरीकरण होते. त्यांनी ‘पन्हाळा ते पावनखिंड’ हा ऐतिहासिक प्रसंग जिवंत केला. Maratha history त्यांच्या सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पन्हाळगडावरून सुटका प्रसंग तसेच बाजीप्रभू देशपांडे व बांदल सेनेचे शौर्य व बलिदान प्रभावीपणे मांडण्यात आले. इतिहास, भावना आणि नाट्यमयतेचा सुंदर संगम साधत त्यांनी मराठा इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय प्रेक्षकांसमोर उभा केला. या कार्यक्रमाचे नागपूरमध्ये पहिले सादरीकरण झाले असून, यापूर्वी विविध मंचांवर याचे २४७ हून अधिक प्रयोग झाले आहेत.
 
श्रीराम मंदिर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष सुनील तिटर्मारे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मंदिराच्या नूतनीकरणाचा व्हिडिओही सादर करण्यात आला, Maratha history ज्यातून ट्रस्टच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. अशा उपक्रमांमुळे तरुण पिढीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी जागरूकता निर्माण होते, असे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाचे समन्वयन धीरज चव्हाण, सुनील तिटर्मारे, अक्षय ठावकर, अनुप धारकर, किरण पेशकर, जयंत चव्हाण, सारंग लेवडीवार आदींनी केले.
सौजन्य: अक्षय काळे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0