रामरक्षा पठनातून मातृशक्तीचा जागर

23 Mar 2026 10:29:32
नागपूर,
ramraksha pathan हिंदू रक्षा समितीच्या वतीने बडकस चौक येथे आयोजित सामूहिक रामरक्षा पठन कार्यक्रमात हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रचार टोलीचे सदस्य मुकुल कानिटकर यांनी मार्गदर्शन करताना रामरक्षा स्तोत्र हे राष्ट्ररक्षणासाठी प्रेरणा देणारे महामंत्र असल्याचे प्रतिपादन केले.
 

RAMRAKSHA 
 
 
पुढे बोलताना श्रीरामाच्या आदर्श पुरुषार्थासोबत सीताशक्तीचे सामर्थ्य आणि श्रीहनुमंताच्या पराक्रमाचा संगम साधण्याचा मार्ग रामरक्षा स्तोत्रातून मिळतो. सामूहिक रामरक्षा पठन म्हणजे देव, देश आणि धर्माच्या कल्याणासाठी केलेला दृढ संकल्प असल्याचे कानिटकर यांनी अधोरेखित केले. जागतिक स्तरावर अनेक देश युद्धाच्या छायेत असताना भारतीय समाज शांतता, स्थैर्य आणि विकासाच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे, ही रामरक्षेचीच प्रचिती असल्याचे त्यांनी सांगितले.
मातृशक्ती जागरणाच्या या उपक्रमाला यंदा एकोणविसावे वर्ष पूर्ण झाले. महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत रामरक्षा पठनाद्वारे वातावरण भक्तिमय केले.ramraksha pathan तसेच सध्याच्या फॅशनच्या नावाखाली वाढणाऱ्या उन्मादाबाबत महिलांनी सजग राहण्याचे आवाहनही कानिटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती. महाआरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसर राममय झाला होता.
Powered By Sangraha 9.0