भांडेवाडी बिडगावमध्ये भीषण आग, ८ गोदामे जळून खाक!VIDEO

23 Mar 2026 19:34:58
नागपूर,
bhandewadi-bidgaon-fire : शहरातील भांडेवाडी बीडगाव परिसरात सोमवारी सकाळी एका फर्निचर कारखान्याला लागलेली आग काही वेळातच भीषण स्वरूप धारण करून आसपासच्या भागात पसरली. सुरुवातीला कारखान्यात लागलेली आग वेगाने पसरत जवळच्या सुमारे आठ गोदामांपर्यंत पोहोचली आणि तेथील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.
 
 


FIRE
 
 
 
घटनेची माहिती मिळताच शहरातील विविध अग्निशमन केंद्रांमधून नऊ दमकल गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आगीची तीव्रता लक्षात घेता अतिरिक्त मदतही मागवण्यात आली. सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली.
 
दरम्यान, गोदामात ठेवलेल्या सुमारे तीन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग आणखी भडकली आणि परिस्थिती अधिक गंभीर बनली. मात्र, या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे. सध्या आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून प्रशासनाकडून तपास सुरू आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0