बेसा दिव्यांगांसाठी सायकल, शिलाई मशीन वाटप

23 Mar 2026 21:46:09
-वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

वाडी, 
Bicycle distribution to the disabled समाजात अनेकजण वाढदिवस हार-तुरे आणि गाजावाजात साजरे करतात. मात्र शिक्षक धनराज बडोले यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा आदर्श दिला. त्यांनी आपला वाढदिवस दिव्यांग बांधवांसोबत साजरा करत गरजू दिव्यांगांना सायकल व शिलाई मशीनचे वाटप केले.
 
 
besa
 
Bicycle distribution to the disabled कार्यक्रमादरम्यान दिव्यांगांसाठी विविध प्रकारचे खेळही घेण्यात आले. या उपक्रमामुळे उपस्थित दिव्यांग बांधवांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. प्रेमाचे दोन शब्द आणि थोडा वेळ दिल्यास त्यांच्या आयुष्यात मोठा आनंद निर्माण होतो,असे मत यावेळी कीर्ती बडोले यांनी व्यक्त केले. यावेळी बुटीबोरीचे नगराध्यक्ष सुमीत मेंढे, सुनील शिरसाट , निलेश बुजुंडे, वनिता कर्‍हाडे, महेंद्रा कर्‍हाडे आदीसह ४७ दिव्यांग बांधव उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0