झेंडामार्चमध्ये सोनिया गांधींना दाखवला होता दत्ताजींनी विरोध

23 Mar 2026 15:52:37
प्रफुल्ल व्यास
वर्धा,
dattaji meghe पवनार या छोट्या गावात जन्म झालेले दत्ता मेघे विदर्भातील ज्येष्ठ नेते झाले. त्यांनी आयुष्यभर कार्यकर्ते जोपासले. म्हणूनच त्यांच्या निधनाची वार्ता कळताच अनेकांची पावलं नागपूरकडे वळली. रात्री अन्त्यदर्शन घेऊन परत आल्यानंतरही आज सकाळी तिच मंडळी पुन्हा नागपुरात पोहोचली. कार्यकर्ते, संबंध जोपासणारा नेता म्हणून ओळख असलेले दत्ता मेघे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी सेवाग्राम येथे काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनाच थेट विरोध दर्शवला होता.
 

दत्ताजी मेघे  
 
दत्ता मेघे यांची राजकीय कार्यकीर्दच काँग्रेसपासुन सुरू झाली. राजकीय आयुष्यात सर्वाधिक काळ ते काँग्रेससोबत जुळून होते. परंतु, जिल्ह्यातील अंतर्गत कलहात त्यांच्याकडे काँग्रेसचे दुर्लक्ष होऊ लागले होते. सेवाग्राम येथे २ ऑटोबर २०१० साली अखिल भारतीय काँग्रेसचे सेवाग्राम येथे झेंडा मार्च अधिवेेशन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, खा. राहुल गांधी यांची उपस्थिती होती. यावेळी खासदार असलेले दत्ता मेघे यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिल्याने दत्ता मेघे प्रचंड दुखावले होते.dattaji meghe त्यांनी कार्यकर्त्यांची बाजू उचलून घेत स्वत:ही व्यासपिठावर न बसण्याचा निर्णय घेतला. शेखर शेंडे यांच्या निवासस्थानापासुन कार्यकर्त्यांसह पदयात्रा काढून दत्ता मेघे सेवाग्राम येथीला झेंडामार्च कार्यक्रमात पोहोचले आणि कार्यकर्त्यांसह ते चक मैदनात खाली बसले होते. काँग्रेसमध्ये राहूनही त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांसोबत कार्यकर्त्यांसाठी पंगा घेण्याची ताकद मेघे यांनी दाखवली होती.
Powered By Sangraha 9.0