वर्धा,
dattaji meghe विदर्भाचे ज्येष्ठ नेते हे दानदातेच होते याच तिळभरही शंका घेण्याचे कारण नाही! दत्ताजी मेघे यांचा देण्यात हात सढळ होता. विदर्भातील किती मुलांचे शिक्षणं त्यांनी पूर्ण केले हे याचा आकडा कोणाचकडे उपलब्ध नाही. मात्र, येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील उप अभियंता असलेले महेश मोकलकर यांनी दिल्लीतून दत्ता मेघे यांची आठवण सांगितली. आपण २१ वर्षाचा असताना त्यांनी आपली इंजिनिअरींगची ५ हजार रुपये फी भरली म्हणून आपण इंजिनिअर झालो. शासकीय नोकरी लागली. रोटरी सारख्या इंटरनॅशल लबमध्येही इंटरनॅशनल पदावर पोहोचलो. सर्व सुबत्ता असतानाही आपण ५३ व्या वर्षी पीएचडीसाठी अर्ज केला असता त्याचे शुल्कही त्यांनीच भरले असल्याचे मोकलकर यांनी सांगितले.

आपल्या घरची परिस्थिती फारच हालाकीची होती. भविष्यात इंजिनिअर होण्याचे स्वप्न होते. परंतु, इंजिनिअरिंगची फी ८ हजार ९०० रुपये होती. वडिलांकडे ४ हजार होते. वडील आपल्याला दत्ताजींकडे घेऊन गेले. फीसाठी पैसे कमी पडत असल्याचे सांगितले. सर्व चौकशी करून दत्ताजींनी ५ हजार रुपये वडिलांच्या हातावर ठेवले आणि आपला सिव्हील इंजिनिअर होण्याचा मार्ग १ मे १९८९ ला मोकळा झाला. आपण इंजिनिअर झाल्याचा त्यांना आनंद झाला. आमचा कौटुंबिक जिव्हाळा तयार झाला. वर्षातून एकदा तरी दत्ताजी आपल्या घरी येत होते. त्यांच्याकडे आपल्या घरात एक खुर्ची होती. त्या खुर्चीवर त्यांच्याशिवाय आजपर्यंत कोणीच बसले नाही. आज ती खुर्चीही आमच्यासह पोरकी झाल्याचे ते म्हणाले.
आपण रोटरी लबमध्येही इंटरनॅशनलपदापर्यंत काम केले. त्याचा त्यांना अभिमान होता. आपण शासकीय नोकरीला लागलो. अनेक सामाजिक संघटनांमध्येही काम करतोय्. गेल्या तीन वर्षांपूर्वी जुलै २०२३ मध्ये पीएचडी करण्याचा विचार मनात आला. हीच इच्छा पितृतूल्य म्हणून त्यांना बोलून दाखवली. त्यांनी पीएचडीची फी किती आहे ही चौकशी केली आणि ती आपण भरणार असल्याचे दत्ताजी म्हणाले. आपण त्यांना आता सर्व सुबत्ता आहे.dattaji meghe मी मोठाही झालो. आतापर्यंत जे केले ते आम्ही विसरणार नाही, असे शब्दात गुंतवत असतानाच त्यांनी तू स्वत: मोठा झाला. पण, माझ्या पेक्षा नाही, असे म्हटल्यानंतर आपण निरुत्तर झालो. त्यांनी आपण २१ वर्षांचा असताना इंजिनिअरिंगची आणि ५३ वर्षाचा असताना पीएचडीची फी भरल्याचे मोकलकर यांनी सांगितले.