विदेशी मद्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

23 Mar 2026 10:06:53
अनिल कांबळे
नागपूर, 
foreign liquor seized हुडकेश्वर पाेलिस ठाणे हद्दीत धार्मिक सणाच्या बंदाेबस्तादरम्यान पाेलिसांनी विदेशी मद्याचा साठ्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पाेलिसांनी मानेवाडा रिंग राेडवरून छत्रपती चाैकाच्या दिशेने जाणारी ऑडी कार (क्र. चक-31-एअ-0004) दिघाेरी चाैकाजवळ नाकाबंदी करून थांबवली. वाहनाची तपासणी केली असता विविध कंपन्यांच्या विदेशी मद्य व बिअरच्या सुमारे 16 पेट्या आढळून आल्या.
 

ऑडीतून दारु तस्करी 
 
 
या मद्याची किंमत अंदाजे 13 लाख रुपये असल्याचे समाेर आले. या प्रकरणी चालक प्रवीण वसंतराव कुरेवार (वय 53, रा. चिटणीस नगर, नंदनवन) याला ताब्यात घेण्यात आले. मद्याची वाहतूक करण्यासाठी वापरलेले वाहन, मद्याच्या पेट्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले. मध्यप्रदेशातून ही विदेशी दारु आणण्यात आली हाेती. मद्याचा हा साठा चंद्रपूरच्या दिशेने नेला जात असल्याचीही चर्चा आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवला असून पुढील तपास सुरू आहे. नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अनामिका मिर्झापूरे यांनी धडक कारवाई केली आहे.foreign liquor seized पाेलिस उपायुक्त रश्मिता राव, सहाय्यक पाेलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चेतन वैद्य, दिनेश गाडेकर, गाेपाल देशमुख, संदीप पाटील, संताेष साेनटक्के यांनी ही कारवाई केली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0