शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातएका रुग्ण निदानाचा संशयकल्लोळ : पण शेवट गोड

23 Mar 2026 22:15:58

Ranada ddsk
यवतमाळ, 
मंगरुळपीर येथील सायमा हमीद खान (वय 30, 3 मुलांची आई) या रुग्णास 2 मार्च 2026 रोजी रात्री 11.45 वाजता येथील वसंतराव नाईक Government Medical College शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अपघात विभागात दाखल करण्यात आले. या रुग्णाची 3 महिन्यांपासून मासिक पाळी न येणे अशी तक्रार होती. तिच्या सोनोग्राफीमध्ये गर्भनलिकेत झालेली अस्थानिक गर्भधारणा जी फुटली आहे आणि पोटात खूप रक्तस्राव झालेला आहे, असा संशय व्यक्त करण्यात आला. यावरून रुग्णास प्रसुती व स्त्रीरोग विभागात दाखल केले. यापूर्वी कारंजा लाडमधील स्त्रीरोग डॉक्टरांनी तिला पोटाच्या खालच्या भागाला सिझरमध्ये जसा आडवा चिरा देतात तसा दिला होता. तिथे 4 तासांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र पोटातील अवयवांमध्ये घट्ट आवरण चढले होते. ते इतके जाड व एकमेकांना चिटकलेले होते की कारंजाचे स्त्रीरोग डॉक्टर ते वेगळे करू शकले नाहीत.
 
 
 
सायमा खान यांचे नेमके निदान होत नसल्यामुळे लगेच ऑक्सिजन लावून स्त्रीरोग डॉक्टरांनी सर्जरी विभागाच्या डॉक्टरांना रुग्ण पाहण्यासाठी बोलावले. सर्जनने त्यांच्या नोट्स लिहून रुग्णाला स्त्रीरोग विभागातच ठेवले.
दुसèया दिवशी सकाळी स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. क्षमा केदार यांनी सर्जरी विभागप्रमुख डॉ. विजय पोटे यांना बोलावून घेतले. त्यांनी तो रुग्ण पाहिला असता त्यांना तिच्या बेंबीच्या खालचे पोट खूपच फुगलेले व कडक झालेले आढळले. रुग्णाला असह्य वेदना होत्या आणि नळीमध्ये गर्भधारणा होऊन नळी फुटून पोटात खूप रक्तस्राव झाला होता.
अशा जवळपास 20 रुग्णांचे ऑपरेशन मी केलेले आहे, पण त्यात इतके कडक पोट कधीच आढळून आले नाही. अशा प्रकारचे कडक पोट अपेंडिक्स किंवा अल्सर फुटल्यामुळे आढळून येते. मला यात जंतूंचा संसर्ग असेल असे वाटले. त्यामुळे त्या रुग्णाला मी सर्जरी विभागात हलविले, असे डॉ. पोटे यांनी सांगितले.
 
 
Government Medical College  यावेळी त्या स्त्री रुग्णाला खूपच जोरदार ताप होता व तिची नाडी जोरदार धावत होती. तिच्या रक्त तपासण्यांत हिमोग्लोबिन फक्त 7 ग्रॅम होते म्हणून तिला 2 बाटल्या रक्त दिले. सीटी स्कॅनमध्ये एक साधा गोळा असल्याचे म्हटले होते. पण रुग्णाच्या लघवीमध्ये गर्भाशयाची तपासणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे डॉ. पोटे यांनी पोट उघडून पाहण्याचा निर्णय घेतला.
शनिवारी सकाळी रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी घेतले. त्याआधी डॉ. पोटे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना सर्व समजावून सांगितले. त्यांची तयारी होती. सुंगणीनंतर त्यांनी पोटाच्या मधोमध चिरा घेऊन पोट उघडले आणि संशयकल्लोळ दूर झाला. ते 10-15 दिवस जुने फुटलेले अपेंडिक्स होते. अपेंडिक्स खूपच जाड व मोठे झाले होते. गर्भाशयाची नळी, पिशवी व अंडाशय नॉर्मल होते.
मी अपेंडिक्स काढून सायमा खानवर शस्त्रक्रिया केली. ती झाल्यावर मला खूपच आनंद झाला व समाधान मिळाले. एक नळी टाकून पोट पूर्ववत शिवले. तिची प्रकृती हळूहळू चांगली होत तिला रुग्णालयातून सुट्टी दिली. यावेळी तिचे नातेवाईक खूप आनंदित झाले, होते असे डॉ. विजय पोटे म्हणाले.
 
 
Government Medical College  या शस्त्रक्रियेत डॉ. राम टोंगले, डॉ. सुमेध साळवे, डॉ. भवानी रेड्डी, डॉ. शिवराज शिंदे, डॉ. सूरज किरपाल, डॉ. शिवाणी इंद्रेकर, डॉ. वेदांत हुमणे, डॉ. अथर्व इंगले, डॉ. आदित्य अय्यंगार, डॉ. प्रवीण सोलंकी, डॉ. गौरव कळबंदे, डॉ. समीर झा, डॉ. नंदनवनकर, डॉ. रोशन शेंडे, डॉ. भूषण अंभारे, डॉ. विनय धकाटे, डॉ. मयंक दातार, नंदा दयालवार, छाया मोरे, संकेत गोंगे व स्वाती रोडे यांचेही सहकार्य मिळाले.
अधिष्ठाता डॉ. प्रशांत उईके आणि अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी डॉ. विजय पोटे आणि त्यांच्या सहकाèयांचे तसेच डॉ. क्षमा केदार यांचे या उत्कृष्ट प्रयत्नांसाठी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन सायमा हमीद खान यांèयावर नीट उपचार केल्याबद्दल कौतुक केले.
Powered By Sangraha 9.0