रामकृष्ण वाघ महाविद्यालयात शहीद दिनानिमित्त अभिवादन

23 Mar 2026 19:08:51
नागपूर,
Ramakrishna Wagh College छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी माता सरस्वती तसेच भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य प्रा. पंकज झगडे, सर्व शाखा विभाग प्रमुख प्रा. दीपक ठाकरे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. किरण पांडे, मराठी विभाग प्रमुख प्रा. सायली लाखे पिदळी, बीएससी विभाग प्रमुख प्रा. स्वाती इंगळे तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. हर्षल रोठे उपस्थित होते.
 
Ramakrishna Wagh College
 
प्रभारी प्राचार्य प्रा. पंकज झगडे यांनी अध्यक्षीय मनोगतातून “देशभक्ती ही केवळ शब्दांत नसून कृतीतून दिसली पाहिजे. शहीदांच्या आदर्शांचे पालन करून आपण चांगले नागरिक बनले पाहिजे,” असे मत व्यक्त केले. सर्व शाखा विभाग प्रमुख प्रा. दीपक ठाकरे यांनी आपल्या मनोगतातून शहीदांच्या बलिदानाचे महत्त्व अधोरेखित केले. Ramakrishna Wagh College कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. मारोती वाघ आणि संस्थेच्या संचालिका लता वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय पाठक यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मोहिनी सोनवाणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. पूनम मेश्राम यांनी मानले. सर्व प्राध्यापकवर्ग व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
सौजन्य: सायली लाखे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0