शासकीय प्रेस सोसायटीत हिंदू संमेलन

23 Mar 2026 12:28:47
नागपूर,
Hindu Sammelan सकल हिंदू समाज आयोजन समितीच्या वतीने विराट हिंदू संमेलन शासकीय प्रेस सोसायटीत नुकतेच आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि भारतमाता पूजनाने झाली. त्यानंतर वक्त्यांचे उद्बोधन तसेच वेशभूषा आणि संगीत सादरीकरण पार पडले.
 
Hindu Sammelan
 
संगीत संध्येत श्रीकांत पिसे, विशाल सहस्रबुद्धे यांच्या साथसंगतीत आनंद किटकर, आनंद जोशी आणि श्रुती पायोवार यांनी देव, देश व धर्म प्रेरक गीतांचे सादरीकरण केले. Hindu Sammelan उपस्थित प्रेक्षकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रसाद वितरणाने या संमेलनाची सांगता करण्यात आली.
सौजन्य: डॉ. प्रभुदास रामटेके, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0