गीत रामायणावर कथ्थक नृत्य कार्यक्रम

23 Mar 2026 12:23:02
नागपूर,
Kathak dance गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या श्रीराम नववर्ष नवरात्रानिमित्त ज्ञानेश्वर मंदिर, बजाजनगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काल गीत रामायणावर आधारित कथ्थक नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. हा कार्यक्रम ललिता हरदास आणि रितिका दलाल यांच्या कथ्थक नृत्यालयातर्फे सादर करण्यात आला. गीत रामायणातील विविध गीतांवर नृत्यालयातील विद्यार्थिनींनी अप्रतिम नृत्य सादर केले. ‘लव कुश रामायण गाती’, ‘राम जन्मला ग सखे’ यांसारख्या अजरामर गीतांवर सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. सर्व प्रेक्षक या सादरीकरणाने मंत्रमुग्ध झाले आणि त्यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
 
Kathak dance
 
या नृत्य कार्यक्रमात ललिता हरदास, रितिका दलाल, राधिका गराडे, पद्मजा खेर्डेकर, अनघा पाटील, श्रुती काऱ्हू, अंतरा नाईक, गौरी तोष्णिवाल, ऋचा सावजी, अंतरा पटेल तसेच बाल कलाकार श्रीमयी काळे, काव्या सावजी आणि ईश्वरी भाटे यांनी बहारदार नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे संचालन नंदिनी देशमुख यांनी केले, तर तांत्रिक सहकार्य मंगेश खेडकर यांनी केले. ज्ञानेश्वर मंदिरातर्फे सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. Kathak dance आभार प्रदर्शनानंतर आरती करून प्रसाद वाटप करण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य: आशिष नाईक, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0