नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्प्याची प्रभावी अंमलबजावणी

23 Mar 2026 21:50:57
मानोरा,
washim-news : तालुक्यातील ग्रापं खंबाळा येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय वाशीम, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय वाशीम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी कार्यालय मानोरा यांच्या माध्यमातून चालू असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.० अंतर्गत श्रमदानाचा कार्यक्रम घेण्यात आला.
 
 
LKL
 
 
 
यावेळी मंडळ कृषी अधिकारी उमेश राठोड यांनी मृद व जलसंधारण चे महत्व पटवून सांगितले आणि फार्मर कप स्पर्धा मध्ये सर्व गावकर्‍यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. यावेळी श्रमदानामध्ये तळ्यातील गाळ काढत गावामध्ये व शेतामध्ये घेण्यात आलेला कार्यक्रम त्यामध्ये शेतकर्‍याने व गावकर्‍यांनी व ग्राम कृषी विकास समितीने भरभरून उत्साह दाखवला. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून पर्यावरण संरक्षण हीच खरी सेवा. नैसर्गिक संपत्ती आहे राष्ट्राची खरी संपत्ती.
 
 
एक पाऊल निसर्गासाठी हजार पाऊले प्रगतीसाठी. पाणी आहे अमृत त्याची करा जपवणूक. अशा प्रकारची नारे देत मुलांची जनजागृतीसाठी खंबाळा या गावातून रॅली काढण्यात आली यामध्ये सहभागी सरपंच सौ नंदिनी विष्णु ससाणे, उपसरपंच अर्जुन गिरकर, सहाय्यक कृषी अधिकारी गोविंद भोसले गावातील ग्रामपंचायत समिती व गावातील नागरिक (छठच् उजजठॄखछअढजठ) हर्षद घुगे व समूह सहाय्यक दिनेश भगत साहेब आणि गावातील सर्व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गावकर्‍यांच्या सहभागाने श्रमदानाचा कार्यक्रम पार पडला.
 
 
Powered By Sangraha 9.0