वेध
पुंडलिक आंबटकर
सहा दशकांपासून नक्षल्यांच्या हिंसक कारवायांमुळे भयभीत आदिवासी जीवन आता मोकळा श्वास घेऊ लागले आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून सशस्त्र नक्षलवाद पूर्णत: नष्ट करण्याचा संकल्प केंद्र सरकारचा आहे. आता यासाठी मोजकेच दिवस उरल्याने Naxalism नक्षलवाद खरोखरच पूर्णत: समाप्त होईल का, प्रश्न निर्माण झाला आहे. बहुतांश नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले असून उर्वरित नक्षल्यांना निष्क्रिय करण्यात आले आहे. तरीही मिसिर बेसरा, पापाराव आणि असिम मंडलसारख्या नक्षलवाद्यांचे आव्हान कायम आहे. शासकीय माहितीनुसार, देशात फक्त १९६ नक्षलवादी उरले असून यातील केवळ २५ ते ३० टक्केच नक्षल्यांकडे शस्त्रे आहेत. उर्वरित नक्षली शस्त्रधारी नक्षल्यांच्या दबावाखाली जंगलात वाचविण्यासाठी भटकत आहेत. पापाराव नावाचा उग्र नक्षली १०० साथीदारांसह छत्तीसगडमध्ये तर मिसिर बेसरा हा झारखंडमध्ये ७० नक्षल्यांसह सक्रिय आहे. तेलंगणामध्ये २० आणि महाराष्ट्राच्या जंगलात अवघे ६ नक्षलवादी उरले आहेत. यातील फक्त एक भामरागडचा असून उर्वरित पाच छत्तीसगडचे आहेत. ११ नक्षल्यांनी नुकतेच गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.
Naxalism नक्षली नेते आपल्या नावापुढे हा शब्द लावतात. डाव्या विचारसरणीच्या दृष्टीने कॉम्रेड म्हणजे साम्यवादी होय. हजारो आदिवासींच्या हत्या करून या लोकांना नेमका कोणता साम्यवाद अपेक्षित होता, हे एकदा नक्षल्यांच्या समर्थकांनी समजावून सांगितले पाहिले. या चळवळीने हजारो निष्पाप नागरिकांच्या हत्या घडवून आणल्या. कित्येकांचे गळे कापले तर कित्येकांना गोळ्या घातल्या. नक्षल्यांच्या हल्ल्यात हजारो जवानांनी प्राणाची आहुती नक्षल्यांचा तथाकथित महासचिव देवजी तसेच रूपेश, रामधेर, भूपती, बारसे देवा, प्रवक्ता अनंत आणि मोहन कडतीसारख्या नक्षलवादी नेत्यांनी आपल्या हजारो साथीदारांसह शस्त्रे खाली टाकली. परंतु, देवजी आणि बारसे देवासारखे कट्टर माओवादी शरणागती पत्करली नसल्याचेच सांगत आहेत. भविष्यात निवडणुका लढविण्याचा संकल्पही देवजीने एका मुलाखतीत बोलून दाखविला.
एकूणच सशस्त्र माओवादी चळवळ नष्ट तरी तिला नवे स्वरूप देण्याचा माओवाद्यांचा मानस लपून राहिलेला नाही. समाजात साम्यवाद रुजविण्यासाठी प्रेम, समर्पण आणि त्यागाची गरज असते. परंतु, माओवाद्यांनी शस्त्रांच्या धाकावर गोरगरिबांचे गळे कापले. ही चळवळ कुठल्या कारणांसाठी सुरू झाली, याची कारणमीमांसा शोधण्यापेक्षा या चळवळीमुळे देश आणि जनतेची किती हानी झाली, याचा विचार प्राधान्याने होणे गरजेचे आहे. पर्यंत गणपती माओवाद्यांचा महासचिव होता. नंतर वय आणि प्रकृतीच्या कारणांमुळे गणपतीने रक्तपात घडविण्यासाठी या संघटनेची सूत्रे नंबाला केशवराव ऊर्फ बसवा राजू याच्या हाती सोपविली. कट्टर डाव्या विचारसरणीच्या बसवा राजूने चंद्राबाबू नायडूंसारख्या नेत्यावर प्राणघातक हल्ला केला होता. हे कटकारस्थान गणपतीच्याच संमतीने रचले गेले होते. सध्या गणपतीला नेपाळमध्ये अटक झाल्याच्या वावड्या असल्या तरी अद्याप ही बाब स्पष्ट झालेली नाही. बसवा राजू याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. तो डाव्या विचारसरणीचा कट्टर समर्थक होता. एका प्रकरणात अटक भोगल्यानंतर तो भूमिगत झाला आणि त्याने घनदाट जंगलाचा मार्ग पत्करला. बसवा राजूने हिडमासारखे कितीतरी जहाल माओवादी निर्माण केले. अखेर बसवा राजूला सैनिकांनी कंठस्नान घातले.
कंत्राटदारांसह अन्य नागरिकांकडून खंडणीच्या रूपात मोठ्य़ा प्रमाणात पैसा उभा केला. नोटबंदीच्या काळात भूपतीच्या चमूला २० कोटी रुपये फेकून द्यावे लागले होते. यावरून नक्षल्यांकडे किती पैसा होता, याचा कयास लावता येतो. तरीही जंगलात सक्रिय असणार्या सामान्य Naxalism नक्षलवाद्यांना आठवडी बाजारात मिळणार्या ५० ते ६० रुपयांच्या चपला घालून जंगलात भटकावे लागत होते. केंद्रीय समिती सदस्याच्या पायात १०० ते १५० रुपयांचा बूट एका मुलाखतीत दिसून आला. करोडोंची वसुली करूनही हा पैसा नेमका कुठे जात होता? हा पैसा अर्बन नक्षल्यांकडे तर वळता होत नव्हता ना? अर्बन नक्षल्यांची मुले देश-विदेशात उच्च शिक्षण घेत असताना या लोकांनी केवळ आपल्या विचारसरणीसाठी गोरगरीब आदिवासी मुला-मुलींच्या हाती शस्त्रे देशाच्या विरोधात युद्ध पुकारले होते. आदिवासी समाज नक्षल्यांच्या या रक्तपाताला कंटाळल्याने अखेर दुर्गम भागातील जनताच या चळवळीविरोधात उभी राहिली. परिणामी, सरकारला नक्षल्यांचा बीमोड करणे शक्य होऊ शकले. लवकरच नक्षलवाद नष्ट होऊन दुर्गम भागही विकासाच्या प्रवाहात यावा, अशीच अपेक्षा देशवासीयांची आहे.
९८८१७१६०२७