रनाळा येथील जुगार अड्डयावर पोलिसांची धाड

23 Mar 2026 21:36:51
-१७ जुगार्‍यांना अटक, तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

कामठी, 
Raid on gambling den नवीन कामठी पोलिस ठाणे हद्दीतील रनाळा ग्रामपंचायत मागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर नागपूर शहर पोलीस आयुक्त युनिट पाचच्या गुन्हे शाखा पथकाने धाड मारून १७ जुगार्‍यांना अटक केली. या पोलिसांनी ३ लाख २ हजार ५३० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून ही कारवाई २२ मार्चला सायंकाळी पाच वाजता सुमारास केली.
 
 
Ranada
 
प्राप्त माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारावर रनाळा गावातील ग्रामपंचायत परिसराजवळ जुगार सुरू असल्याची खात्री पटताच, सपोनी गणेश कदम व त्यांच्या पथकाने अचानक छापा टाकला. यावेळी तिथे जुगार खेळणार्‍या १७ जणांना ताब्यात घेतले. जुगार्‍याकडून ११,२८० रुपये रोख तसेच विविध कंपनीचे १६ महागडे मोबाईल असा एकूण ३ लाख दोन हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्या आरोपी मध्ये मोहम्मद इब्राहिम मोहम्मद अली (४०), सय्यद इम्रान सय्यद मुमताज (४०), क्रांती दीपक साहू (३२), सुशील सुधीर शेंडे (२५, रा. नागपूर), सोयल खान (२२र्, रा. नागसेन नगर कामठी), मोहम्मद शाकीर ताज मोहम्मद (३७), मोहम्मद आबीद मोहम्मद हबीब (४४), शेख सारिक शेख अब्दुल (२८), सतीश गुलाबराव यादव (३८), इमरान खान सुभान खान (३९), सय्यद इर्शाद सय्यद ताहीर (२५), गौतम कानोजी चौरे ( ५०), शेख सलीम शेख दरबारी (५४) ,शेख करीम शेख महमूद अखिल खान जाहिद खान (४०), तहसीन अख्तर मुस्ताक अहमद (३२), तारीख शेख महबूब (३७) आदीचा समावेश असून या १७ जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
 
 
Raid on gambling den  विशेष म्हणजे, या जुगारासाठी जागा उपलब्ध करून देणारा प्रफुल्ल अंबादास राव (रा. रनाळा कामठी) हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.हीकारवाई पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे (युनिट ५, गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरोपींविरुद्ध नवीन कामठी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पुढील तपास कामठी पोलिस करत आहे.
Powered By Sangraha 9.0