रामनवमीनिमित्त रामरक्षा पठण

23 Mar 2026 13:12:41
नागपूर,
Ram Raksha Pathan रामनवमीनिमित्त श्रद्धानंद पेठ येथील हनुमान मंदिरात सामूहिक रामरक्षा पठणाचे आयोजन करण्यात आले होते. या पठणात ११० भाविक सहभागी झाले होते. भाविकांनी तेरा वेळा रामरक्षा पठण करून वातावरण भक्तिमय केले.
 
Ram Raksha Pathan
 
रामनामाच्या जयघोषात रामरक्षा आणि मारुती स्तोत्राचे पठण करण्यात आले. या उपक्रमाद्वारे सनातन धर्मपरंपरेचे जतन करण्याचा प्रयत्न भाविकांनी यशस्वीपणे केला. Ram Raksha Pathan रामरक्षा पठणानंतर महिलांसाठी चैत्रगौरी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता डाळपन्हे आणि प्रसाद वितरणाने करण्यात आली.
सौजन्य: अभय चोरघडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0