छत्तीसगड,
Sanjay Van Vatika Park छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यातील अंबिकापुर येथील संजय वनवाटीकेमध्ये भयानक घटना घडली. येथे असलेल्या हरणांच्या काळपावर चार-पाच श्वानांनी हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल १५ हरणांचा मृत्यू झाला. ही वनवाटीला पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे,
जिथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यामुळे हरणांवर झालेला हल्ला अधिक गंभीर मानला जात आहे. याप्रकरणी वन विभागाने तत्काळ कारवाई करत चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. यामध्ये डिप्टी रेंजर अशोक सिन्हा आणि तीन ममता परते, प्रतिमा लकडा आणि बिंदु सिंह या तीन वनपालांचा समावेश आहे. माहितीनुसार, हा श्वानांचा कळप जवळच्या जंगलातून येथे शिरला आणि हरणांवर हल्ला केला.पोस्टमार्टमनंतर मृत हरणांचे अंतिम संस्कार करण्यात आले. सरगुजा सर्किलचे मुख्य वन संरक्षक दिलराज प्रभाकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ही घटना हरणांच्या सुरक्षेच्या बाबतीत गंभीर निष्काळजीपणा असल्याचे सांगितले आहे.