शरद पवार आज नागपूर दौर्‍यावर

23 Mar 2026 21:18:54
मेघे कुटुंबीयांची घेणार सांत्वनपर भेट
नागपूर,
 

sharad pawar 
 
ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष Sharad Pawar शरद पवार मंगळवारी, २४ मार्च रोजी नागपूरला येत आहेत. त्यांच्यासोबत माजी अनिल देशमुख हे देखील दुपारी ३.३० वाजता विशेष विमानाने मुंबईहून नागपूर विमानतळावर पोहोचतील. तेथून ते थेट खामला परिसरातील दत्ताजी मेघे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील. सांत्वन भेटीनंतर ते पुन्हा विशेष विमानाने मुंबईकडे रवाना होतील.
Powered By Sangraha 9.0