सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठिय्या

23 Mar 2026 21:19:38
वर्धा, 
public-works-department : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर जिल्ह्यातील कंत्राटदारांनी एकत्र येत सोमवार २३ रोजी ठिय्या आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी कार्यकारी अभियंत्यांच्या दालनासमोर ठिय्या देत निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणि प्रलंबित देयक तातडीने अदा करावी, अशी मागणी केली.
 
 
JK
 
 
 
निविदा प्रक्रियेत पक्षपातपूर्ण पद्धती वापरल्या जात आहेत, त्या त्वरित बंद कराव्यात, तसेच निविदा ३३-३३-३४ या पारदर्शक प्रमाणात काढण्यात याव्यात, निविदा प्रक्रियेत होणारा कथित मॅनेजचा प्रकार तात्काळ थांबवावा, ३३-३३-३४ या नियमांनुसार टेंडर जारी करावेत, मजूर संस्थांना कुशल कामे देऊ नयेत, मागील २ वर्षांपासून प्रलंबित देयके मार्चपूर्वी अदा करावीत आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून रेटून धरल्या. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे निवेदन उपअभियंता मुत्तेलवार यांनी स्विकारले.
 
 
आंदोलनात किशोर मिटकरी, अजय घवघवे, संदीप ताकसांडे, मुन्ना झाडे, प्रशांत धोटे, पिंटू सातपुते, निकी चव्हाण, विशाल शेंडे, प्रमोद चव्हाण, अरविंद कोकाटे, संजय शेरजे, बाबा जाकीर, महेश जगताप, दीपक पागूळ, रमेश भगत, आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0