विजय वडेट्टीवारवर १०० कोटी मानहानीचा दावा

23 Mar 2026 21:55:07
वाशीम,
raju-patil-raje : माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नकली नोटा प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल असून, मला शासन पाठीशी घालत असल्याचा आरोप करुन माझी बदनामी केली. याप्रकरणी आपण १८ मार्च २०२६ रोजी वाशीम जिल्हा सत्र न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानी दावा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने हा दावा स्वीकारला आहे, अशी माहिती भाजपा नेते राजू पाटील राजे यांनी स्थानीक सर्कीट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना आज दिली.
 
 

JK
 
२८ डिसेंबर २०२५ रोजी माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सार्वजनिक माध्यमांसमोर वाशीममध्ये नकली नोटा प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल असूनही अटक झाली नाही तसेच शासन आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला होता. मात्र, हे सर्व आरोप खोटे व निराधार असल्याचे राजू पाटील यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी ३ जानेवारी २०२६ रोजी वडेट्टीवार यांना कायदेशीर नोटीस बजावून १५ दिवसांत खुलासा करण्यास व सार्वजनिक माफी मागण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी ना खुलासा केला ना माफी मागितली. त्यामुळे १८ मार्च २०२६ रोजी वाशीम जिल्हा सत्र न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानी दावा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने हा दावा स्वीकारला आहे. या प्रकरणाचा दावा क्रमांक १३/२०२६ असून, संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. विजय वडेट्टीवार यांच्यासह हरीष सारडा, तेजराव ईनामदार, पंकज इंगोले, आनंद खेर्डे, टी. व्ही. ९ चॅनल यांचेवरही विद्यमाान न्यायालयात दावा दाखल केला आहे.
 
 
पत्रकारांशी बोलतांना भाजपा नेते राजू पाटील राजे म्हणाले की, माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असून याविरोधात न्यायालयात लढा देणार आहे. ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते न्यायालयात सादर करावेत, अन्यथा जनतेची माफी मागावी. यावेळी त्यांनी वाशीम जिल्ह्यातील जनतेला आपल्या सार्वजनिक कार्याबाबत पारदर्शकता असल्याचे सांगत, खोट्या आरोपांना कायदेशीर मार्गानेच उत्तर देणार असल्याचे स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0