तभा वृत्तसेवा
आर्णी,
minor-girl-was-kidnapped : अल्पवयीन पीडितेला लग्नाचे अमिष दाखवून फूस लावून पळवून नेणाèया आरोपी संघपाल अशोक रामटेके (वय 26, बोंदडगवान, ता. माहूर, जि. नांदेड) याला आर्णी पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. अल्पवयीन पीडितेला जबरदस्ती पाठलाग करून लग्नाचे अमिष दाखवून फूस लावून संघपाल रामटेके याने सोमवार, 23 मार्चला पळवून नेल्याची तक्रार पीडितेच्या वडिलांनी मंग़ळवार, 24 मार्चला आर्णी पोलिस ठाण्यात दिली.
या तक्रारीवरून अशोक रामटेके याला आर्णी पोलिसांनी अटक करून पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला. पीडितेच्या वैद्यकीय तपासणीनंतर गुन्ह्यात वाढ होऊ शकते. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पल्लवी निनगुरकर करीत आहेत.