भांडेगाव टोलनाका बंद करा; मविआचे पुन्हा आंदोलन

24 Mar 2026 20:11:44
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
bhandegaon-toll-plaza : दारव्हा-कारंजा मार्गावरील भुलाई-भांडेगाव दरम्यान सुरू असलेल्या वादग्रस्त टोलनाक्याच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने पुन्हा सोमवार, 23 मार्चला आंदोलन करण्यात आले.
 
 
y24March-Toll-Naka
 
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी आंदोलन यशस्वी होऊ न देण्याकरिता पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने पोलिसांकडून दडपशाही करण्यात आल्याचा आरोप मविआ पदाधिकाèयांनी केला आहे.
 
 
या टोल नाक्याविरोधात यापूर्वीही 11 मार्चला आंदोलन करण्यात आले होते. तसेच जिल्हाधिकाèयांसोबत 13 मार्चला झालेल्या बैठकीत टोलनाका बंद करण्यावर शिक्कामोर्तबही झाले होते. मात्र राजकीय दबावापोटी जिल्हाधिकाèयांनी निर्णय फिरविल्याने टोलवसुली सुरूच असल्याचा आरोप करीत मविआच्या वतीने पुन्हा टोलनाका बंद करण्याकरिता आंदोलन करण्यात आले.
 
 
स्थानिक जनतेच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. तसेच या कारवाईला पालकमंत्र्यांचे आशीर्वाद असल्याचा आरोपही नेते राहुल ठाकरे यांनी केला. दरम्यान टोल वसुलीमुळे शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांवर आर्थिक भार पडत असल्याने हा टोलनाका तत्काळ बंद करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी पुन्हा केली.
 
 
यावेळी काँग्रेसचे प्रकाश नवरंगे, अतुल राऊत, सय्यद फारूख, मनोहर नवरंगे, मसूद खान तसेच उबाठा शिवसेनेचे अजय गाडगे, संतोष ठाकरे, अमोल दुधे या पदाधिकाèयांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Powered By Sangraha 9.0