संथ प्रवाहात हरवत चालली सेलूची बोर नदी

24 Mar 2026 21:11:41
पुरातन महादेव मंदिराच्या पायथ्याशी अस्तित्वाचा संघर्ष
 
आशिष धापुडकर
सेलू, 
शहरातील पुरातन शिव मंदिर अर्थात महादेव मंदिर परिसर हा धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला परिसर म्हणून ओळखला जातो. या मंदिराच्या पायथ्याशी वाहणारी Bor River बोर नदी सध्या संथ प्रवाहामुळे आणि दुर्लक्षामुळे नदीचे मूळ अस्तित्वच धोयात आले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
 
 
bor dks
 
Bor River महादेव मंदिराच्या पायथ्याशी वाहणारी बोर नदी पूर्वी स्वच्छ, निर्मळ आणि प्रवाही होती. गावातील नागरिक, शेतकरी आणि भाविक यांच्यासाठी ही नदी जीवनाचा महत्त्वाचा आधार होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून नदीच्या प्रवाहात घट झाली असून पाणी संथपणे वाहू लागल्याने नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर हिरवळ आणि गवत उगवले आहे. नदीचे पात्र अनेक ठिकाणी झुडपे आणि जलवनस्पतींनी व्यापले असून त्यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह अडथळला जात आहे. पूर्वी पावसाळ्यात भरून वाहणारी बोर नदी आता अनेक ठिकाणी ओळखूही येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीच्या पात्रात साचलेला गाळ, वाढलेली जलवनस्पती आणि देखभालीचा अभाव यामुळे नदीचे रूप बदलत चालले आहे. काही ठिकाणी तर नदीचे पात्र पूर्णपणे हिरव्या गवताने झाकले गेले असून पाण्याचा प्रवाह दिसेनासा झाला आहे. सध्या नदीच्या दयनीय अवस्थेमुळे हा परिसरही आपले पूर्वीचे सौंदर्य गमावत आहे. नदी पात्राची साफसफाई, गाळ काढणे आणि जलवनस्पतींचे निर्मूलन करण्यात अशी मागणी करण्यात येत आहे. सेलूच्या इतिहासाची, संस्कृतीची आणि निसर्गसंपदेची साक्ष देणारी एक अमूल्य धरोहर आहे. योग्य वेळी पावले उचलली नाहीत तर संथपणे वाहणारी ही बोर नदी इतिहासाच्या पानांमध्येच उरून जाईल, अशी भीती व्यत करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0