कारंजात एकाच रात्री दोन घरफोडी; दोन घरफोडींचा प्रयत्न

24 Mar 2026 21:21:09
कारंजा (घा.), 
Burglary in the karanja शहरात प्रभाग १६ मध्येे एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी चार घरांना लक्ष्य करत मोठा धुमाकूळ घातला. चोरट्यांनी दोन बंद घरात चोरी केली तर दोन घरांत चोरीचा प्रयत्न केला. या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार राहुल देशमुख हे बाहेर गावी गेल्याने त्यांच्या घरी कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सामान पूर्ण अस्तावस्त करून रोख लंपास केली. ते घरी आल्यानंतर त्यानं चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांच्या घरा मागील गल्लीत राहणारे सत्यनारायण आघाव हेही बाहेर गावी गेले होते. त्यांच्याही घरी कोणी नसल्याचे हेरून चोरट्यांनी यांच्या घरात शिरून चोरी केली.
 
 
karanja
Burglary in the karanja त्यानंतर चोरट्यांनी आघाव यांच्या घरासमोरील शिरपूरकर यांच्या गेटचे कुलूप तोडले व घरातील दरवाज्यावर थापा मारल्या. घरात शिरपूरकर यांच्या पत्नी होत्या. त्यांना ठोकण्याचा आवाज आल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता एक जण दारात व एक जण रस्त्यावर दिसून आले. त्यांनी आरडाओरड केल्याने ोरट्यांनी पळ काढला. त्यानंतर जवळपास असलेल्या राजेश खवशी यांच्या गेटचे कुलूप तोडून गल्लीतील दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, खवशी यांच्या मुलीने दाराला खुर्ची लावत दार अडविण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड करून वडिलांना फोन केला त्यामुळे चोरट्यांनी तेथून सुद्धा धूम ठोकली. एकाच रात्री झालेल्या दोन घरफोड्या व दोन घरात चोरीचा प्रयत्नांच्या प्रकारामुळे येथे भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी राममंदिर व महामार्गानजिक असलेल्या बकुल जसानी यांच्या किराणा दुकानातही चोरी झाली आहे. चोरटे दिवसा बंद घराची पाहणी करतात व रात्री डल्ला मारतात असे अशी नागरिकांची चर्चा आहे. प्रभाग १६ मध्ये यापूर्वीही चोर्‍या झाल्या. आता मात्र चोरट्यांची हिम्मत वाढत गेली आहे. बंद घरांना लक्ष्य करून चोरटे एकाच रात्री अनेक ठिकाणी चोर्‍या करीत असल्यामुळे कारंजा शहरांत घरफोडी व कुलूपबंद घरांवर डल्ला मारण्याच्या घटनांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. शहरात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी करण्यात येत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0