छत्रपती शिवाजी महाराज चौक सौदर्यीकरण कामाचा शुभारंभ

24 Mar 2026 20:48:29
शिरपूर जैन, 
Chhatrapati Shivaji Maharaj Chowk येथील बस स्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्र लावलेल्या ठिकाणचे सौंदर्यीकरण कामाचा शुभारंभ प्रशासक सिंधुताई कांबळे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र चौधरी, सादीक सेठ बागवान, संजय जाधव, गजानन इरतकर, प्रशासक समितीचे सदस्य कलीम रेगीवाले, असलम परसुवाले,पप्पु देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
shivaji
 
Chhatrapati Shivaji Maharaj Chowk शिरपूर येथील बस स्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा लावलेल्या ठिकाणाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी गावातील शिवप्रेमीं कडुन करण्यात आली होती. ही मागणी ग्रामपंचायतच्या वतीन काही दिवसांपूर्वी मान्य करण्यात आली. त्यानुसार सोमवार २३ मार्च रोजी सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या कामावर जवळपास २ लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील सौंदर्यात याची निश्चितच भर पडणार आहे. यावेळी मुक्तारखा पठाण, बाबू गौरवे, गजानन भोसले, विलास कांबळे, बबन देशमुख, आतिष जाधव, अमर देशमुख, विलास देशमुख, अमोल देशमुख, गजानन देशमुख, शशिकांत देशमुख, संदीप देशमुख, वसंतराव देशमुख, बळीराम भालेराव, दीपक वाघ, राजेश देशमुख, शंकर वाघ हे उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0