साताऱ्यात भाविकांचे वाहन पलटले

24 Mar 2026 16:57:10
सातारा,
Devotees' vehicle overturns in Satara सातारा जिल्ह्यात देवीच्या यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पाटण तालुक्यातील निवकणे परिसरातून जानाई देवीच्या दर्शनासाठी जात असताना जळव घाटात ही दुर्घटना घडली. घाटातील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप गाडी उलटली आणि भीषण अपघात झाला.
 
 
janaie
 
या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे आठ ते दहा भाविक जखमी झाले आहेत. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथे हलवण्यात आले आहे, तर इतर जखमींना तारळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच जळव आणि आसपासच्या गावांतील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यात स्थानिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला असून पुढील तपास सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0