धुंडीराज महाराजांची पुण्यतिथी भक्तिभावात संपन्न

24 Mar 2026 19:46:24

देऊळगाव राजा,

प.पू. धुंडीराज महाराज कवीश्वर यांच्या ४८ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित त्रिदिवसीय अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. २० ते २२ मार्चदरम्यान धुंडीराज महाराज उपासना धाम येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसर दुमदुमून गेला.
 
 
 
jlk
 
 

या निमित्ताने श्री धुंडीराज महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन, अभिषेक व महाआरती ब्राह्मणवृंदांच्या मंत्रोच्चारात पार पडली. कार्यक्रमात श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण, भावार्थ रामायण प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन तसेच विविध धार्मिक विधी संपन्न झाले.

 

कीर्तन महोत्सवात ह.भ.प. गणेश महाराज घुगे, ह.भ.प. डॉ. भगवान बाबा आनंदगडकर तसेच ह.भ.प. संत चरणदास निकम महाराज गुरुजी यांनी कीर्तनसेवा दिली. या सोहळ्यास पंचक्रोशीतील वारकरी, भजनी मंडळे, सेवेकरी, मंदिराचे संचालक मंडळ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेत पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली. हा सोहळा श्री धुंडीराज महाराज कवीश्वर उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

Powered By Sangraha 9.0