केळकरवाडी वस्तीत आयोजन
वर्धा,
Hindu Sammelan सकल हिंदू समाजाच्या वतीने केळकरवाडी वस्तीत विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पुर्वी वर्धेत महाआरती करण्यात आली. या महाआरतीत शेकडो महिलांनी सहभाग घेतला. या संमेलनाला प्रमुख वते म्हणून श्री संत विचार अध्ययन समितीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक प्रा. सुभाष लोहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख यांची उपस्थिती होती. हिंदू संघटित झाला तर राष्ट्र संघटित होईल. यासाठी एकत्रिकरणाची अत्यंत आवश्यकता आहे. हिंदू समाजाने एकत्र येत समता, बंधुत्व व समरसता साकारावी. कुठेही जातीभेदाला थारा न देता हिंदू समाज म्हणून आपण एकत्र यावे, असे आवाहन प्रा. सुभाष लोहे यांनी केले. यावेळी त्यांनी हिंदूंची कुटुंब व्यवस्था, पर्यावरण, नागरिक कर्तव्य आदी विषयावर भाष्य करताना समरसतेवर अधिक जोर दिला.
Hindu Sammelan याप्रसंगी विश्वशांती स्तुपाचे संस्थापक संत सयाजी महाराज यांनी आशीर्वाद दिले. या संमेलनात श्रीरामाच्या नवरात्रनिमित्त भारत माता व श्रीरामाची महाआरती करण्यात आली. संमेलनाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. प्रास्ताविक श्रीधर देशमुख तर आभार प्रदर्शन सौरभ देशमुख यांनी केले. यशस्वीतेसाठी विजय उईके, संजय आष्टनकर, शुभांगी कोलते, श्रेया देशमुख, अजित नेरकर, मंगेश भाके, मधुकर बोरकुटकर, विनोद बांगडकर, रेवती नेरकर, साक्षी अंदनकर, महेश धाये, रमा केळकर, प्रकाश पवार, रामू लष्कर, प्रवीण पाथरकर, अनिरुद्ध जोशी, मुता पिसे यांनी परिश्रम घेतले.