जादुटोण्याच्या संशयातून पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला

24 Mar 2026 20:13:15
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
husband-and-wife-attacked : तालुक्यातील वारा येथे जादुटोण्याच्या संशयातून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राळेगाव पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
 
 
h
 
 
 
पोलिसांच्या माहितीनुसार, अदिती पुंडलिक अराडे (वय 19, वाèहा, ता. राळेगाव) यांच्या तक्रारीवरून याच गावातील प्रभाकर उदेभान मांडरे (वय 55), अमोल प्रभाकर मांडरे (वय 30), भास्कर उदेभान मांडरे (वय 50) आणि एक अल्पवयीन मुलगा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 
 
ही घटना सोमवार, 23 मार्च रोजी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास घडली. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार, तिची आई सुरेखा उर्फ मेधा अराडे अंगण साफ करत असताना आरोपी अमोल मांडरे हा हातात काठी घेऊन त्यांच्या घरासमोर आला व तुमच्या जादुटोण्यामुळे आमच्या घराचा सत्यनाश झाला, असा आरोप करीत आईला काठीने मारण्यास सुरुवात केली.
 
 
आईची आरडाओरड ऐकून वडील पुंडलिक अराडे हे घराबाहेर आले असता आरोपींनी त्यांनाही बेदम मारहाण केली. यावेळी अन्य आरोपी प्रभाकर मांडरे हा लोखंडी सत्तूर घेऊन आला व सुरेखा यांच्या गळ्यावर वार केला. तसेच चेतन मांडरे याने त्यांचे हात धरून मारहाणीला मदत केली. या हल्ल्यात सुरेखा अराडे यांच्या मानेवर गंभीर जखम झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे.
दरम्यान, वडिलांनाही काठ्यांनी डोक्यावर, पाठीवर व पायांवर मारहाण करण्यात आली. दोघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. घटनेनंतर आरोपींनी शिवीगाळ करत कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला.
 
 
या प्रकरणी राळेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 109, 118 (1), 352 (2), 352 (3) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यात सहायक निरीक्षक योगेश दंदे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक विशाल बोरकर तपास करीत असून सर्व आरोपींना रात्रीच ताब्यात घेतले आहे.
 
 
या घटनेमुळे ग्राम वाèहा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जादुटोण्याच्या संशयातून होणाèया अशा घटनांबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
Powered By Sangraha 9.0