- आमगावकरांचा सवाल ; जुन्या मिरची मार्केटमधील अतिक्रमण काढण्याची मागणी
आमगाव,
Market encroachment येथील नगर परिषद अंतर्गत हद्दीत स्थानिक नागरिकांनी टीनाचे शेड तयार केले, यावर नगर प्रशांनाने नोटीस बजावल्यानंतर सर्वच अतिक्रमणधारकांनी नोटीसला मान देत आपले अतिक्रमण स्वतः काढले. मात्र, दुसरीकडे शहरातील गट क्र. ६२ वरील जुना मिर्ची मार्केट समोरील जागेत काहींनी टीनाचे पक्के दुकानगाळे उभारून अतिक्रमण केले असून संबंधित अतिक्रमणधारकांवर कसलीच कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली नाही. त्यामुळे ते अतिक्रमण कधी काढणार? असा प्रश्न आता आमगावकर करू लागले आहे.
Market encroachment गट क्रमांक ६२ वरील अतिक्रमणाबाबतची तक्रार शहरातील काही सुज्ञ नागरिकांनी १९ मे २०२५ रोजी नगर परिषदेकडे केली होती, त्यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी यांनी २ जून २०२५ रोजी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम १ व पोट कलम १५ व १९ अन्वये, केवळ एकाच व्यक्तीला नोटीस बजावून कागदी घोडे नाचविले. दरम्यान, सदर जागेवरील सात बारा जिल्हा परिषदच्या नावे असल्याने पं.स. गटविकास अधिकारी यांच्याशी विचारणा केली असता ग्रामपंचायतीचे नगर परिषद रुपांतर झाल्यानंतर गट न. ६२ चा ताबा नगर परिषदेकडे वर्ग करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. असे असताना नगर परिषदेकडून अद्याप एकाही अतिक्रमणधारकावर कारवाई करण्यात आली नाही. सदर शासकीय जागेवर एकून ५ दुकानगाळे तयार करण्यात आले असून काही राजकीय पक्षाचे पुढारी, समाज सेवक, हाटेल व्यवसायीक, कंत्राटदारांनी हे वाटून घेतल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली. सदर जागेवरील अतिक्रमण काढून त्या ठिकाणी उद्याण किंवा नगर परिषदेचे कार्यालयाचे बांधकाम करावे अशी मागणी आता शहरवासियांकडून होत आहे.