तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
mini-ministry-document-inspection : जिल्हा परिषदेतील कामे वेळेत निकाली निघावी, म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी ई-ऑफिस प्रणाली सुरू केली. मात्र, या मोहिमेला कर्मचाèयांकडूनच हरताळ फासण्यात येत असल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्राथमिक शिक्षण विभागाची मंगळवार, 24 मार्च रोजी दप्तर तपासणी केली. मात्र, या तपासणीवरून कर्मचाèयांत राजकारण रंगले असून, सामान्य प्रशासन विभागाची तपासणी कधी करणार असा प्रश्न कर्मचाèयांमधून उपस्थित केल्या जात आहे.
जिल्हा परिषदेमार्फत केंद्र व राज्य सरकारच्या लाखो रुपयांच्या योजना राबविण्यात येतात. मात्र, कर्मचाèयांच्या वेळकाढू धोरणामुळे अनेक कामे वेळेत निघत नाहीत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी ई-ऑफिस प्रणाली सुरू केली. या प्रणालीमुळे कोणत्या विभागात फाईल ‘पेंडिंग’ आहे आणि किती दिवसांपासून आहे, याची माहिती कळते.
काही वेळकाढू कर्मचाèयांमुळे सीईओंच्या मोहिमेला चक्क धाब्यावर बसविले जात आहे. त्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण विभागाची सात कर्मचाèयांकडून दप्तर तपासणी केली. या तपासणीला शिक्षण विभागाकडून सर्व मदतसुद्धा करण्यात येत आहे.
मात्र, जिल्हा परिषदेचा आत्मा म्हणून ओळख असलेल्या सामान्य प्रशासन विभागापासून तपासणीची सुरुवात का करण्यात आली नाही, असा प्रश्न यावेळी कर्मचाèयांमधून उपस्थित करण्यात येत आहे. मार्च महिना असल्याने अनेक देयके अदा करण्याचे काम सुरू असताना सामान्य प्रशासन विभागाकडून केवळ शिक्षण विभागाचीच तपासणी करण्यात येत आहे.
सर्व विभागांची तपासणी होणार का ?
केवळ एकाच विभागाची तपासणी करण्यात आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की सामान्य प्रशासन विभागापासून इतर सर्व विभागांची दप्तर तपासणी करणार का, असा प्रश्न कर्मचाèयांतून उपस्थित करण्यात येत आहे.