अन्नछत्रालयास भोग पूजनाने सुरुवात

24 Mar 2026 20:09:49
तभा वृत्तसेवा
पुसद, 
indranil-naik : श्रीराम नवमीनिमित्त पोहरादेवी येथे जाणाèया सेवालाल भक्तांसाठी इंद्रनील नाईक यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या येथील सेवालाल महाराज गोरछात्रालयात राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते भोगपूजन करून अन्नछत्रालयाची सुरुवात करण्यात आली.
 
 
y24March-Chhatralaya
 
सेवालाल भक्तांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे मत याप्रसंगी नाईक यांनी व्यक्त केले. स्व. राज नाईक यांनी अन्नछत्रालयाच्या माध्यमातून सेवालाल भक्तांची सातत्याने सेवा केल्यामुळे स्व. राज नाईक यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देऊन गोर अन्नछत्रालयाच्या माध्यमातून सेवालाल भक्तांची सेवा करणाèया छत्रालयाच्या सेवेकèयांचे नाईक यांनी अभिनंदन केले.
 
 
या गोर अन्नछत्रालयाच्या उद्घाटनप्रसंगी इंद्रनील नाईक, महंत जितेंद्र महाराज, राजुदास जाधव, कैलास महाराज हेगडी, रामेश्वर महाराज पिंपळगाव, दीपक आसेगावकर, अ‍ॅड. उमाकांत पापीनवार, श्रीराम पवार, दयाराम चव्हाण, राजेश सोळंके, विठ्ठल खडसे, विजय जाधव, अभिजित पानपट्टे, बाबूसिंग आडे, ऋषीकेश पंडितकर, अक्षय महाकाळ, करण ढेकळे, सुनील ढाले, मजहर खान, झहीर, निखिल ठाकरे, नितीन पवार, अशोक वडते, आशिष काळबांडे, शेख कय्युम, मदन गायकवाड, डॉ. मधुकर नाईक, रणवीर पाटील यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेंद्र जाधव, प्रास्ताविक प्रा. संजय चव्हाण तर आभारप्रदर्शन उत्तम जाधव यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0