पाेलिसांची वाॅकीटाॅकी घेऊन आराेपी पळाला

24 Mar 2026 21:50:25
- पाेलिस विभागाची प्रतिमा मलिन

अनिल कांबळे
नागपूर, 
Police walkie-talkie कायदा व सुव्यवस्था कायम ठेवणे आणि सामान्य नागरिकांची सुरक्षा अशी दुहेरी अपेक्षा पाेलिसांकडून असते. मात्र, पाेलिसच आराेपींसमाेर हतबल हाेत असेल तर सुरक्षेच्या विश्वासाला तडा जाताे. अशीच एक घटना लकडगंज परिसरात वाहतूक पाेलिसांसाेबत घडली. एका मद्यपी आराेपीला तपासणीनंतर झाेन कार्यालयात नेत असताना आराेपीने चक्क पाेलिसाची वाॅकी-टाॅकी हिसकावून पळ काढला. या प्रकारामुळे पाेलिस दलात खळबळ उडाली आहे. मात्र, या घटनेमुळे पाेलिस दलाची प्रतिमा मलीन झाली. प्रवीण कराडे (26, अर्जुनी माेरगाव, गाेंदिया) असे आराेपीचे नाव आहे.
 

waki 
 
 (संग्रहित छायाचित्र )
 
Police walkie-talkie  गेल्या 21 मार्च राेजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास चंद्रशेखर आझाद चाैक ते मारवाडी चाैक मार्गावर वाहतूक शाखेचे कर्मचारी राजू लक्ष्मणसिंग बागडी आणि त्यांचे सहकारी कैलास टाक कर्तव्यावर हाेते. बालाजी मंदिराकडून येणारी एमएच 29-सीएल 0872 क्रमांकाची दुचाकी पाेलिसांनी अडवली. चालकाच्या ताेंडातून येणाèया मद्याच्या वासामुळे संशय बळावला. ब्रीथ अ‍ॅनालायझर चाचणीसाठी त्याला वाहतूक कार्यालयात नेण्याचे ठरविण्यात आले. कराडेला बागडी यांनी त्यांच्या दुचाकीच्या मागे बसविले व त्याचा सहकारी साैरभ वरखडे हा टाक यांच्या दुचाकीच्या मागे बसला. जुना माेटर स्टँड चाैकाजवळ उड्डाणपुलाच्या खांबाजवळ पाेहाेचताच कराडेने अचानक मागून हात टाकत बागडी यांच्या दुचाकीची चावी काढण्याचा प्रयत्न केला. बागडी यांनी गाडी थांबविली; परंतु, कराडेने त्यानंतर त्याने त्यांच्याजवळील सरकारी वाॅकी-टाॅकी हिसकावली व पळ काढला. टाक हे दुचाकीवर समाेर हाेते, त्यामुळे त्यांना हा प्रकार लक्षातच आला नाही. बागडी यांनी लकडगंज पाेलिस ठाण्यात तक्रार केली. पाेलिसांनी कराडेविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
वाहतूक पाेलिस कर्मचारी हतबल
आराेपीने पाेलिसांशी आरेरावी केली आणि पाेलिस कर्मचाèयाला धक्काबुक्की केली. त्यानंतर पाेलिसांना दमदाटी करीत त्याच्या कमरेला खाेचलेली वाॅकी-टाॅकी हिसकावून पळ काढला. वाहतूक पाेलिसाने त्याचा पाठलाग केला असता आराेपी पाेलिसांच्या हाती सापडला नाही. घटनेनंतर पाेलिस कर्मचारी रिकाम्या हाताने लकडगंज पाेलिस ठाण्यात परतले. लेखी तक्रारीनंतर पाेलिसांनी वाॅकी टाॅकी पळविल्याचा गुन्हा दाखल केला.

एका आराेपीने वाहतूक पाेलिसांकडे असलेली वाॅकी-टाॅकी हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- संजय खंदाळे (पाेलिस निरीक्षक, लकडगंज वाहतूक शाखा)
Powered By Sangraha 9.0