श्वानाचे नख लागल्याने रेबीज, सहा महिन्यानंतर चिमुकलीचा मृत्यू

24 Mar 2026 18:23:39
मुंबई
Rabies child death Mumbai पालघर जिल्ह्यातील नालासोपारा वेस्ट येथील सबोध सागर इमारतीत राहणाऱ्या नऊ वर्षांच्या कशिश साहानी या चिमुकलीने दुर्दैवी मृत्यू पत्करला. सहा महिन्यांपूर्वी भटक्या कुत्र्याच्या नखामुळे झालेल्या किरकोळ जखमेवर योग्य वैद्यकीय उपचार न केल्यामुळे तिच्या शरीरात रेबीजचा संसर्ग पसरला आणि अखेरीस तिचे जीवन संपले, अशी माहिती स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
 

Rabies child death Mumbai 
काही महिन्यांपूर्वी दादासोबत चालताना एका भटक्या कुत्र्याच्या नखामुळे कशिशच्या हाताला किरकोळ जखम झाली. कुटुंबीयांनी तिला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र रेबीज प्रतिबंधक लसीचा संपूर्ण कोर्स घेण्यास चिमुकलीने संकोच केला. आरोग्य विभागाचे अधिकारी सांगतात की जखम त्वरीत बरी झाली असली तरी रेबीज विषाणू शरीरात हळूहळू पसरत होते .
अलीकडे तिच्या तब्येतीत अचानक बिघाड जाणवू लागला. ती अन्न आणि पाणी स्वीकारण्यात नकार देऊ लागली, तसेच डोळे लाल दिसू लागले. गंभीर अवस्थेत तिला स्थानिक रुग्णालयात दाखल केले आणि नंतर पुढील उपचारांसाठी मुंबईतील कस्तूरबा रुग्णालयात नेण्यात आले. तज्ज्ञांनी उपचार केले, परंतु रेबीजचा प्रगतीशील संसर्ग थांबवता आला नाही आणि उपचारादरम्यानच कशिशचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालानुसार मृत्यूचे कारण रेबीज हेच आहे.
Powered By Sangraha 9.0