राजमाता जिजाऊ पुरस्काराने डॉ. वर्षा मासुरकर यांचा गौरव

24 Mar 2026 15:03:05
नागपूर,
Rajmata Jijau Award राजमाता जिजाऊ यांच्या संस्कार, शौर्य आणि दूरदृष्टीच्या परंपरेचा गौरव करणारा “राजमाता जिजाऊ पुरस्कार – २०२६” सोहळा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पार पडला. अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
 

noo 
 
 
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ माजी कुलगुरू,डॉ. कमल सिंग सुधाकर कोहळे माजी आमदार व ग्रामीण भाजप अध्यक्ष संजय पवार संस्थापक अध्यक्ष, अविष्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष,,काप्ता राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक तसेच नागपूर जिल्हा अविष्कार फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. Rajmata Jijau Awardया सोहळ्यात कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. वर्षा मासुरकर यांना त्यांच्या शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “राजमाता जिजाऊ पुरस्कार २०२६” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन नेहा रेभे व सहसूत्रसंचालन इशिता काप्ता यांनी केले, ज्यामुळे सोहळ्याला अधिक आकर्षकता प्राप्त झाली.
  सौजन्य :डॉ. वर्षा मासुरकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0