निरंतर २१० वर्षांपासून रामजन्मोत्सव अन् १४० वर्षांची झाली घोडा यात्रा

24 Mar 2026 21:06:58
गिरड येथील प्राचीन श्रीराम मंदिरात जन्मोत्सवाची जय्यत तयारी
 
विलास नवघरे
समुद्रपूर, 
Ramjanmatsav डोळ्याचे पारणे फेडणारा राम जन्मोत्सव आणि सुप्रसिद्ध घोडा यात्रा २६ मार्च रोजी संताच्या पावलाने गिरडच्या पावन भूमीत साजरा होणार आहे. तो पाहण्याकरिता विदर्भाच्या कानाकोपर्‍यातील भाविकांची येथे हजेरी लागते. यंदा गुढी पाडव्याच्या दिवशी अयोध्येवरून श्रीरामाच्या पावन स्पर्शाने आलेल्या पादुकांची गावात भव्य मिरवणूक काढून रामजन्मोत्सवला सुरूवात करण्यात आली. रुपेश महाराज तळवेकर यांच्या मधूर वाणीतून दररोज रामचरितमानसचे आयोजन असून ९ दिवस विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांची रेलचेलने संपूर्ण गिरडनगरी राममय झाली आहे. या रामजन्मोत्सव आणि घोडा यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे.
 
 
Ram
 
गिरड येथे २१० वर्षांपूर्वी बांधलेल्या पुरातण श्रीराम मंदिराने तिसर्‍या शतकात पदार्पण केले. येथील घोडा यात्रेचे हे १४० वे वर्ष आहे. येथील राम मंदिराचा पाया २१० वर्षे जुना आहे. येथे पैठणहून आलेल्या संत सीताराम महाराजांचा मठ होता. १८१५ मध्ये सीताराम महाराजांनी मठाचे श्रीराम मंदिरात रूपांतर केले. तेव्हापासून अखंड पूजापाठ सुरू आहे तर १४० वर्षांपूर्वी येथे रामनवमीनिमित्त घोडायात्रेला प्रारंभ झाला. ही यात्रा मंदिर निर्माणानंतर ७१ वर्षाने १८८६ मध्ये सुरू झाली. १८१२ मध्ये सीताराम महाराज प्रवास करीत पैठण येथून गिरडला आले. त्यांना गिरड गाव आवडले आणि गोपाळकृष्ण मंदिराजवळ गवताची झोपडी करून रामभती सुरू केली. महाराजांनी येथे ३० वर्षे वास्तव्य केले. सीताराम महाराजांनी आपल्या झोपडीत लाकडापासून बनवलेल्या श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली. ४० वर्षांनंतर त्यांनी येथे देहत्याग केला. त्यांच्या मृत्यूपूर्वी महाराज परमहंसांनी दीक्षा दिली.
 
 
Ramjanmatsav  श्रीराम जन्मोत्सवाची परंपरा पार पाडण्यासाठी रामकृष्ण महाराजांनी या मंदिराच्या सेवेसाठी अखंड ३० वर्षे तपस्या करून सिद्धी प्राप्त केली. राम मंदिराची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिराचे बांधकाम मंदिराला दान केलेला शेतमाल विकून पूर्ण झाले. १८९८ मध्ये बाजीराव महाराजांनी समाधी घेतली. त्यानंतर त्यांचे शिष्य मंसाराम महाराजांनी १० वर्षे या मंदिराचे काम हाती घेतले आणि त्यांनी सर्वप्रथम आपले शिष्य रुपराम महाराज यांना आपला उत्तराधिकारी घोषित केले. रात्रंदिवस परिश्रम करून या मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यास २४ वर्षे लागली. त्यानंतर रतीराम महाराज, अनंतदास महाराज, रामदास शास्त्री महाराज आदींनी या मंदिराचा कारभार हाती घेतला. १९६६ पासून विश्वस्त मंडळाची स्थापना झाली. शेतीच्या उत्पन्नावर रामजन्मोत्सव, घोडायात्रा उत्सव साजरा केला जातो. हे मंदिर आजही नवीनच आहे. आधुनिकता आणि हायटेक युगातही राम जन्मोत्सव व घोडायात्रेत दरवर्षी हजारो रामभत सहभागी होतात.
 
 
Ramjanmatsav  यावर्षी २६ मार्च रोजी १२ वाजता रामजन्मोत्सव व सायंकाळी ६ वाजता भव्य मिरवणूक काढून १४० वी प्रसिद्ध घोडा यात्रा काढण्यात येणार आहे. श्रीराम मंदिर देवस्थानला ‘क’ वर्ग तिर्थ क्षेत्राचा दर्जा प्राप्त झाले. देवस्थान कमिटीने रामजन्मोत्सव आणि घोडा यात्रेची जय्यत तय्यारी सुरू केली आहे.
Powered By Sangraha 9.0