रामनवमी निमित्त रामरक्षा पठण व चैत्रगौरी हळदी-कुंकू उत्साहात

24 Mar 2026 15:32:09
नागपूर,
Ram Navami रामनवमीच्या निमित्ताने ‘मुक्तागणं’ सख्या मंडळाच्या वतीने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत १३ वेळा रामरक्षा पठण, रामनामाची जपमाळ तसेच मारुती स्तोत्राचे पठण करण्यात आले. विशेष म्हणजे या उपक्रमाला यंदा १५ वर्षे पूर्ण झाली.
 
nagpur
 
रामरक्षेच्या सुरांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. यावेळी चैत्रगौरी हळदी-कुंकू कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. Ram Navami महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून मंगलमय शुभेच्छा दिल्या. गप्पा, हास्य आणि पारंपरिक रितीरिवाजांनी कार्यक्रमाला अधिक रंगत आली. शेवटी आरती व प्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी रंजना ढोले, गीता चिकेरूर, वर्षा देशपांडे, संध्या देशकर, वैशाली पितळे, दया देशपांडे, वंदना देशपांडे, अपर्णा कुळकर्णी, सपना रोडी, माधुरी मुटे आणि अंजली गव्हाणे यांचे सहकार्य लाभले.
सौजन्य: कल्पना वारणशिवार, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0