संत गजानन महाराजांची चिलम आज राम मंदिरात

24 Mar 2026 21:16:43
वर्धा, 
Sant Gajanan Maharaj' संत गजानन महाराज हे १९०९ रोजी आकोट तालुयातील मांडगाव येथे गेले असता रामसिंग राजपूत यांच्या घरी थांबले. त्यावेळी त्यांनी विनाविस्तव पेटवलेली चिलम त्यांच्या सेवेकरी विष्णूपंत पाठक यांना आशीर्वादरुपाने भेट दिली. विष्णूपंत पाठक यांनी देह सोडताना ती चिलम त्यांचे विश्वासू त्र्यंबकराव वडाळकर यांना देखभाल करण्यासाठी १९७८ मध्ये दिली. तीच चिलम आज मंगळवार २४ रोजी वर्धेतील संत गजानन महाराज मंदिरात आली. बुधवार २५ रोजी ही चिलम दर्शनासाठी येथील श्रीराम मंदिर (गोलबाजार) येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे.
 
 
jajanan
 
Sant Gajanan Maharaj'  गजानन महाराजांची विनाविस्तव पेटवलेली चिलम साडेसहा इंच लांब असून त्यावर अष्टधातूचे वेष्टन आहे. त्यावर बारीक रंगीत तारेचे सुंदर नक्षीकाम सुद्धा केलेले आहे. तसेच महाराजांचा पदस्पर्श केलेल्या चांदीच्या लहान पादुका व लहान बिल्ला यांचे सुद्धा दर्शन या माध्यमातून होणार आहे. ही चिलम श्रीराम मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून भाविक भतांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम मंदिरचे सचिव विजय धाबे यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0