मदतीचा हात देणारा नेता मिळणे कठीण

24 Mar 2026 19:36:54
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया
शरद पवार यांनी घेतली मेघे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
 
नागपूर.
राज्याचे माजी मंत्री दत्ता मेघे यांच्या निधनाने राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत असताना त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. मदतीसाठी आलेल्या कोणत्याही व्यक्तीला नाही हा शब्द कधीच ऐकण्यास मिळत नव्हता. सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वोपरी प्रयत्न करणारा आणि मदतीचा हात देणारा मिळणे कठीण आहे, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष Sharad Pawar शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
 

sharad 

मेघे कुटुंबीयांचे केले सांत्वन
ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष Sharad Pawar  शरद पवार यांनी मंगळवारी, सायंकाळी ५वाजता खामला परिसरातील दत्ता मेघे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत माजी अनिल देशमुख हे देखील होते. जवळपास अर्धा तासपर्यंत ते मेघे यांच्या निवासस्थानी होते. कुटुंबीयांतील आमदार समीर मेघे, सागर मेघे आदींसोबत चर्चा केली. याप्रसंगी माजी मंत्री राजेंद्र मुळक, किरण पांडव, राजा तिडके आदींची उपस्थिती होती. माध्यम प्रतिनिधीसोबत दहा मिनिट बोलल्यानंतर ५.४० वाजता ते मेघे यांच्या निवासस्थानवरुन विमानतळाकडे निघाले. त्यानंतर विशेष नागपूरहून मुंबईला रवाना झले.
मागील दीड महिन्यापासून Sharad Pawar  शरद पवार आजारी होते. दत्ता मेघे यांच्या घरी सांत्वनपर भेटीसाठी आज नागपुरात आले. राजकीय कारकीर्दी त्यांच्या अत्यंत निकटवर्ती राहिलेले नेते दत्ता मेघे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. सांत्वन भेटीनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते पुढे म्हणाले, राजकीय जीवनात त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दातृत्व आणि करूणेचे मूर्तिमंत रूप असलेल्या दत्ताभाऊने राजकीय व सामाजिक क्षेत्रासोबतच शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे.
Powered By Sangraha 9.0