तंदुरुस्तीचा सोपा मंत्र...आठवड्यातून दोन दिवस व्यायाम

24 Mar 2026 15:43:55
Simple fitness mantra आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. निरोगी राहण्यासाठी रोज तासन्‌तास व्यायाम करावा लागतो किंवा महागड्या साधनांची गरज असते, असा समजही अनेकांच्या मनात आहे. मात्र एका नव्या संशोधनातून हा समज चुकीचा असल्याचे समोर आले आहे. या अभ्यासानुसार, आठवड्यातून केवळ दोन दिवस योग आणि साधे व्यायाम केले तरी शरीर तंदुरुस्त राहू शकते. या संशोधनात मोठ्या संख्येने प्रौढ व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. त्यांच्या माहितीच्या आधारे असे दिसून आले की, नियमितपणे आठवड्यातून दोन दिवस स्नायूंवर काम करणारे व्यायाम केल्यास शरीराची ताकद वाढते आणि संतुलनही सुधारते.
 
exercise
 
योगासोबतच बसकण्या, दंड बैठक किंवा घरातील जड वस्तू उचलणे यांसारखे साधे व्यायाम प्रकारही शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. यामुळे शरीरातील हालचाली अधिक सुलभ होतात, थकवा कमी जाणवतो आणि दैनंदिन कामे अधिक सहजपणे करता येतात. तसेच वयानुसार पडण्याचा धोका कमी होण्यासही मदत होते.तज्ज्ञांच्या मते, स्नायूंना बळकट करण्यासाठी दररोज व्यायाम करण्याची गरज नसते. Simple fitness mantra आठवड्यातून दोन दिवसही नियमितपणे व्यायाम केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. मात्र सातत्य ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अधिक चांगले परिणाम मिळवण्यासाठी आठवड्यातून तीन ते चार दिवस व्यायाम करण्याचा सल्लाही दिला जातो.
 
योगाभ्यास आणि इतर व्यायाम आवश्यक
विशेषतः पाठ, गुडघे आणि नितंबांच्या स्नायूंवर काही वेळ लक्ष केंद्रित केल्यास शरीराची ताकद आणि हालचाल क्षमता वाढते. केवळ चालण्याने संपूर्ण आरोग्य सुधारत नाही, तर शरीरातील विविध स्नायूंवर योग्य ताण येण्यासाठी योगाभ्यास आणि इतर व्यायाम आवश्यक असतात. Simple fitness mantra योग ही भारतीय परंपरेतील एक महत्त्वाची देणगी मानली जाते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी योग उपयुक्त ठरत असून, नियमित सराव केल्यास दीर्घकाळ निरोगी आणि सक्रिय जीवन जगणे शक्य होते.
Powered By Sangraha 9.0