दिव्यांग वधू-वर परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

24 Mar 2026 13:13:33
नागपूर
disabled bride and groom इंद्रधनू विकलांग संस्था, शिवमुद्रा अपार्टमेंट, प्रतापनगर, नागपूर यांच्या वतीने शनिवार, दिनांक २१ मार्च २०२६ रोजी प्रार्थना भवन, शांतीनिकेतन कॉलनी, कोतवाल नगर, नागपूर येथे दिव्यांग वधू-वरांसाठी विवाह परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. वर्तमानपत्रे आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जाहिरातीमुळे नागपूर व परिसरातील अनेक दिव्यांग या मेळाव्यास उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
 
disabled
 
या मेळाव्यास एकूण ५६ दिव्यांग मुला-मुलींसह त्यांचे पालक व इंद्रधनू कार्यकारिणी असे सुमारे १२५ जण उपस्थित होते. काही मुला-मुलींनी एकमेकांशी परिचय करून घेतल्यानंतर परस्पर पसंतीही दर्शविली. अशा विवाह जुळविण्यासाठी इंद्रधनू विकलांग संस्था नेहमीच प्रयत्नशील असते. disabled bride and groom कार्यक्रमाचे आयोजन इंद्रधनू संस्थेच्या संपूर्ण कार्यकारिणीने मोठ्या मेहनतीने केले. जे उमेदवार मेळाव्यास प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांनी व्हॉट्सॲपद्वारे स्वतःची माहिती पाठवून नोंदणी केली.
 
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरचे प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. पराग राहातेकर उपस्थित होते. तर डॉ. प्रतिमा शास्त्री, अध्यक्ष, आशादिप संस्था, नागपूर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. प्रार्थना भवन हॉल इंद्रधनू संस्थेला नेहमीच माफक दरात उपलब्ध करून देत सहकार्य करत असते. disabled bride and groom परिचय मेळाव्यात इंद्रधनू संस्थेच्या वतीने सर्व उपस्थितांना चहा व फराळ देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व दिव्यांग, त्यांचे पालक तसेच मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सौजन्य: वर्षा किडे कुळकर्णी, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0