गव्हा येथे कृत्रिम पाणी टंचाई

24 Mar 2026 20:26:21
गटविकास अधिकार्‍यांना निवेदन
 
मानोरा, 
गव्हा ग्रामपंचायत हद्दीत कृत्रिम  Water shortage पाणी टंचाई निर्माण केल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी गटविकास अधिकारी, यांच्याकडे प्रशासक राहुल भगत यांनी २३ मार्च ला निवेदनद्वारे केली आहे. प्राप्त माहितीनुसार, गव्हा गावातील प्रभाग क्रमांक १, २ व ३ तसेच नदीच्या उत्तरेकडील भागात पाणी टंचाई असल्याची तक्रार पंचायत समितीकडे केली आहे.
 
 
water
 
Water shortage  मात्र, ही तक्रार राजकीय आकसापोटी करण्यात येत असून, गावाची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप निवेदनातून भगत यांनी केले आहे. दरम्यान, गावात पाणी उपलब्ध असून विंधन विहीर दुरुस्त करण्यात आली आहे. तसेच मागील वर्षी खोदलेल्या विंधन विहिरीला पाणी लागले असून, ग्रामस्थ नियमितपणे पाणी भरत असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकार्‍यांनी गावात प्रत्यक्ष भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी करावी व पाणी टंचाई आहे की नाही याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून त्या अहवालाची एक प्रत आपणास द्यावी असे निवेदनातुन मागणी करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0