आ. संजय गायकवाड यांचा पुढाकार
बुलढाणा,
Water supply scheme ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतच्या थकित इॅलेक्ट्रिक बिलामुळे बंद पडल्या असून जनतेला मुबलक पाणी उलब्ध असतांना देखील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामारे जावे लागत असल्याने या भिषण परिस्थिती लक्षात घेऊन यावर कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी आ. संजय गायकवाड यांनी केली होती. या अनुषंगाने पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात दि. २४ मार्च रोजी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली.
Water supply scheme उपरोक्त गंभीर व भेडसावणार्या पाणी प्रश्नावर आ. संजय गायकवाड यांनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. यामध्ये माहिती देतांना आ. गायकवाड यांनी सांगितले की, बुलढाणा विधानसभा मतदार संघात आपण आमदार होण्यापूर्वी १६५ गावापैकी १४५ गावात जलजिवन मिशन व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा प्रादेशिक योजनांची कामे पूर्णत्वास नेली असतांना आपण आमदार झाल्यापासून मतदार संघातील १४५ गावांच्या पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या. त्यातील ८५ टक्के कामे पूर्णत्वास आली. यामुळे निम्या गावातील पाणी टंचाई संपूष्टात आली. मागील ७६ वर्षापासून भेडसावणारी पाणीटंचाई आता केवळ एक किवा दोन गावापूरती शिल्लक राहिली. यामूळे मोताळा तालुका शंभर टक्के टँकर मुक्त झाला मात्र अनेक ग्रामपंयातीमधील निर्माण होणार्या विविध अडचणीमुळे शिवाय ग्रामपयंचतीकडून नियोजीत वेळेत इॅलेक्ट्रिक बिल न भरल्या गेल्याने ग्रामपंचायत मुलभूत सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे सदर योजना सोलर सिस्टीमवर घेण्याबाबत आ. संजय गायकवाड यानी मागणी केली होती. त्यावर तातडीची बैठक आयोजित करण्यात येऊन ना. गुलाबराव पाटील यांनी संबधित अधिकार्यांना सुचना दिल्या तसेच राज्यातील सर्व पाणीपूरवठा योजना सोलर सिस्टीमवर घेण्याबाबत योग्य त्या उपाय योजना तातडीने करण्यात यावा असा धोरणात्मक निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे आता लवकरच ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या जलजिवन मिशन व प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सोलर सिस्टीमवर चालविण्यात येतील या क्रांतीकारी निर्णयामुळे जनतेला पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागणार नाही असा विश्वास आ. संजय गायकवाड यांनी व्यक्त केला. या बैठकीला पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील. आ. संजय गायकवाड, प्रधान सचिव, सदन सचिव पाणीपुरवठा व संबधित खात्याचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.