बुलढाणा,
buldhana-zilla-parishad : जिल्हा परिषद बुलढाणा यांचा सन २०२५-२६ चा सुधारित व सन २०२६-२७ चा रु. ४१ कोटी २३ लाखांचा मूळ अर्थसंकल्प सामान्य सभेत मंजूर करण्यात आला. मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड यांनी अर्थसंकल्प सादर केला असून मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक गुलाबराव खरात यांनी त्यास मंजुरी दिली.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) कोल्हे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, शिवशंकर भारसाकळे, प्रमोद एंडोले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते, जिल्हा कृषी विकास अधिकारी अंगाईत, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. हा अर्थसंकल्प मुद्रांक शुल्क अनुदान, जमीन महसूल अनुदान, गुंतवणुकीवरील व्याज व इतर उत्पन्न यांचा विचार करून तयार करण्यात आला असून, जिल्हा परिषदेच्या गुंतवणुकीवरील व्याजातून उत्पन्नात वाढ झाल्याने यंदाचा अर्थसंकल्प वाढीव आहे. शासन नियमांनुसार खर्चात समाज कल्याणासाठी २० टक्के, महिला व बाल कल्याणासाठी १० टक्के, देखभाल-दुरुस्ती २० टक्के, दिव्यांग कल्याण ५ टक्के, शाळा दुरुस्ती ५ टक्के, समृद्ध पंचायत अभियान १० टक्के व ई-गव्हर्नन्ससाठी ०.५ टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे.