कारच्या धडकेत आजाेबा ठार, नात गंभीर जखमी

25 Mar 2026 18:38:01
अनिल कांबळे,
नागपूर, 
car-accident-nagpur : एका भरधाव कारने समाेरुन येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक आजाेबाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेली 12 वर्षीय नात गंभीर जखमी झाली. हा अपघात कान्हाेलीबारा-खडकी मार्गावर झाला. देवराव नारायण उईके (55, खडकी, हिंगणा) असे मृताचे तर अक्षरा विजय सराटे असे गंभीर जखमी नातीचे नाव आहे.
 
 
AJHJK
 
 
 
साेमवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास देवराव उईके हे त्यांची नात अक्षरा विजय सराटे (12) हिच्यासह दुचाकीने तेलाचा पिपा घेऊन घरी जात हाेते. टाकळघाट येथील वास्तुलॅण्ड डेव्हलपर्ससमाेरून जात असताना समाेरून येणाèया कारने (एमएच 40 सीएक्स 3647) त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. धडक इतकी जाेरात हाेती की देवराव आणि अक्षरा दाेघेही रस्त्यावर काेसळून गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने देवराव उईके यांना एम्स रुग्णालयात नेले, मात्र डाॅक्टरांनी त्यांना तपासून मृत घाेषित केले. अक्षरा हिच्यावर सुरुवातीला कान्हाेलीबारा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचार करून तिला पुढील उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी देवराव उईके यांचा मुलगा सूरज देवराव उईके (28) याने दिलेल्या तक्रारीवरून हिंगणा पाेलिसांनी अज्ञात कार चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
Powered By Sangraha 9.0