अनिल कांबळे
नागपूर,
route for ram navami procession रामनवमीनिमित्त गुरुवारी पाेद्दारेश्वर राम मंदिर येथून शाेभायात्रा निघणार येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक प्रमुख मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. या प्रमुख मार्गावरील वाहतूक दुपारी 12 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने वळविण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पाेलिस उपायुक्त लाेहित मतानी यांनी दिली.
ही शाेभायात्रा मेयाे हाॅस्पिटल चाैक, भगवाघर चाैक, गंजाखेत चाैक, जुना भंडारा राेड, शहीद चाैक, सराा बाजार, गांधी पुतळा चाैक, बडकस चाैक, महाल चाैक, गांधी गेट, शिवाजी चाैक, टिळक पुतळा, सुभाष राेड, आग्याराम देवी चाैक, काॅटन मार्केट चाैक, लाेखंडी पूल, शनी मंदिर, आनंद टाॅकीज चाैक, मुंजे चाैक, झाशी राणी चाैक, व्हेरायटी चाैक, सीताबर्डी मेन राेड, मानस चाैक, गणेश टेकडी मंदिर, जयस्तंभ चाैक व रामझुला मार्गे पुन्हा पाेद्दारेश्वर राम मंदिर येथे समाप्त हाेणार आहे. शाेभायात्रेच्या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध चाैकांवर वेळेनुसार पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.route for ram navami procession नागरिकांनी नमूद कालावधीत संबंधित मार्ग टाळावेत, पयायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पाेलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पाेलिस उपायुक्त मतानी यांनी केले आहे.