वादग्रस्त वक्तव्यावर AIMIMचा मोठा निर्णय!

25 Mar 2026 20:19:36
नवी दिल्ली,
taukeer-nizami-suspended : ईदच्या पार्श्वभूमीवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे AIMIMने आपल्या नेत्यावर कडक कारवाई केली आहे. तौकीर निजामी यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित करण्यात आले आहे.
 
 
taukeer-nizami-suspended
 
 
निजामी यांनी मुस्लिम समाजाला ईदची खरेदी फक्त मुस्लिम दुकानदारांकडूनच करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आणि विविध स्तरातून टीका झाली.
 
पक्षाने या वक्तव्याला शिस्तभंग मानत तात्काळ कारवाई केली. AIMIMने स्पष्ट केले की, अशा प्रकारची विधाने पक्षाच्या धोरणाशी सुसंगत नाहीत आणि सामाजिक सलोखा बिघडवणारी आहेत.
 
दरम्यान, या प्रकरणामुळे धार्मिक वातावरणात तणाव निर्माण झाला असून, विविध संघटनांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Powered By Sangraha 9.0