अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला! VIDEO

25 Mar 2026 18:19:25
वॉशिंग्टन,
iran-missile-attack-on-american-warship : मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेच्या युद्धनौकेवर मोठा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. इराणने अमेरिकेच्या ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ या युद्धनौकेच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला आहे.
 
 
iran-missile-attack-on-american-warship
 
 
इराणच्या लष्कराने सांगितले की, ही युद्धनौका त्यांच्या हल्ल्याच्या मर्यादेत आल्यास ती पूर्णपणे नष्ट करण्यात येईल. या घटनेमुळे आधीच तणावग्रस्त असलेल्या मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.
 
दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून, या संघर्षाचा परिणाम जागतिक सुरक्षेवर आणि तेलपुरवठ्यावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
 
 


सौजन्य: सोशल मीडिया
 
Powered By Sangraha 9.0