नवी दिल्ली,
Notices to two Congress offices दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाला दोन कार्यालये खाली करण्याच्या नोटिसा मिळाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. २४ अकबर रोड येथील पक्षाचे जुने कार्यालय आणि ५ रायसीना रोड येथील युवक काँग्रेसचे कार्यालय रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे पक्षासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षाने नवीन इंदिरा भवन येथे स्थलांतर केले असले तरी २४ अकबर रोड येथील कार्यालय अद्याप पूर्णपणे रिकामे करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रशासनाकडून ही नोटीस बजावण्यात आली असून २८ मार्चपर्यंत कार्यालय खाली करण्याची मुदत देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे ठिकाण पक्षाचे महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. रायसीना रोडवरील युवक काँग्रेसच्या कार्यालयाला नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.