एका अफवेने नागरिकांची उडाली झोप

25 Mar 2026 19:58:14
तभा वृत्तसेवा
पारवा, 
crowd-at-petrol-pumps : ‘पुढील पाच दिवस पेट्रोल मिळणार नाही’ अशा अफवेमुळे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील आदिवासीबहुल क्षेत्र पारवा या ग्रामीण भागात, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध असूनही, नागरिक घाबरून गर्दी करीत आहेत. प्रशासनाने अद्याप अधिकृत टंचाई जाहीर केली नसली तरी, भीतीपोटी नागरिक वाहनांच्या टाक्या फुल्ल करीत आहेत. प्रशासनाने अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, इंधन साठेबाजी न करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
 

y25March-Petrol 
Powered By Sangraha 9.0